PYQ Vault

MPSC Group C Prelims 2025, 11 Jan 2026 question paper

100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    सन 1915 मध्ये म. गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले ? अ. बिहार मधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न. ब. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न. क. अहमदाबाद शहरातील मील मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष. ड. मुस्लीमासाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करणे.
    After M. Gandhiji came to India in 1915, which of the following problems did he handle successfully ? a. The indigo problem of Champaran in Bihar. b. The land revenue problem of the farmers of Kheda. c. The conflict between the mill workers and the owners in Ahmedabad city. d. Creating a separate electorate for Muslims.

    Tap an option to check your answer.

  2. 2
    3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते ? अ. कृष्णा रामा कुऱ्हाडे ब. वि. स. पागे क. गोविंद खोत ड. डॉ. य. कृ. सोवनी
    Which of the following activists led the March to the Mamledar Court of Tasgaon on 3rd September 1942 ? a. Krishna Rama Kurhade b. V. S. Page c. Govind Khot d. Dr. Y. K. Sovani

    Tap an option to check your answer.

  3. 3
    खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. अ. त्यांनी 'ज्ञान प्रकाश' हे मराठी वृत्तपत्र काढले. ब. सरकारने त्यांचा 'जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर' या पदव्या देऊन गौरव केला. क. त्यांना संगीत विषयाची आवड होती.
    Identify the social reformer from the following description. a. He started the Marathi newspaper 'Dnyan Prakash'. b. The government honored him with the titles 'Justice of Peace and Rao Bahadur'. c. He had a deep interest in music.

    Tap an option to check your answer.

  4. 4
    खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते ? अ. 'शारदासदन' आणि 'आर्य महिला समाज' या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब. इ. स. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने 'कैसर-ए-हिंद' या पदवीने सन्मान केला. क. इ. स. 1894 साली त्यांनी 'हिंदु लेडिज सोशल क्लब' ची स्थापना केली. ड. ठाकरसी, टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले.
    Which women reformer's work do you identify by reading the following statements ? A. She was active in the women's emancipation work of the organization 'Shardasadan' and 'Arya Mahila Samaj'. B. The Government honored her with the title of 'Kaisar-i-Hind' for her social work in 1913. C. She founded the 'Hindu Ladies Social Club' in 1894. D. Her work for the emancipation of women was supported by Thakarsy and Tata families by providing financial assistance.

    Tap an option to check your answer.

  5. 5
    महाराष्ट्रातील 1857 च्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. ब. कोल्हापूरात 31 जुलै 1857 रोजी 21 व्या व 28 व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. क. नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. ड. 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीचे लढाईत भिल्लांचा पराभव झाला.
    Which of the following statements are correct regarding the uprising of 1857 in Maharashtra ? a. Rangrao Page made relentless efforts to regain the lost kingdom of Chhatrapati Pratapsingh of Satara. b. Soldiers of the 21st and 28th regiments mutinied in Kolhapur on 31st July 1857. c. In Princely State of Nargunda, Bhave's adopted son was disowned and he rebelled in May 1858. d. The Bhillas were defeated in the battle of Amba Pani on 11th April 1858.

    Tap an option to check your answer.

  6. 6
    जोड्या लावा :
    राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व ठिकाणअध्यक्ष
    अ. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 - कलकत्ताI. बद्रुद्दिन तय्यबजी
    ब. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 - मद्रासII. विल्यम वेडरबर्न
    क. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 - अलाहाबादIII. दादाभाई नौरोजी
    ड. काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889 - मुंबईIV. जॉर्ज युल
    Match the pairs :
    National Congress Sessions and VenueChairman
    a. Second Session of Congress 1886 – CalcuttaI. Badruddin Tyabji
    b. Third Session of Congress 1887 – MadrasII. William Wedderburn
    c. Fourth Session of Congress 1888 – AlahabadIII. Dadabhai Naoroji
    d. Fifth Session of Congress 1889 – MumbaiIV. George Yule

    Tap an option to check your answer.

  7. 7
    कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला ? अ. शेतकरी ब. जमीनदार क. कारखानदार ड. कारागीर
    In the permanent settlement system, which class benefitted the most ? a. Farmers b. Zamindars (Landlords) c. Industrialists d. Artisans

    Tap an option to check your answer.

  8. 8
    खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही ? अ. त्यांनी 'पंजाबी' हे वृत्तपत्र प्रकाशित केले. ब. त्यांनी 'यंग इंडिया' या ग्रंथाचे लेखन केले. क. 'वंदे मातरम' या वृत्तपत्रातून त्यांनी 'पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी' चा सिद्धांत मांडला. ड. 'पॉलटिकल फ्यूचर ऑफ इंडिया' या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले.
    Which of the following Newspaper and Literature is not associated with Lala Lajpat Rai ? A. He published the Newspaper 'Punjabi'. B. He wrote the book 'Young India'. C. He formulated the 'Theory of Passive Resistance' in Newspaper 'Vande Mataram'. D. He wrote the book 'Political Future of India'.

    Tap an option to check your answer.

  9. 9
    1919 च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती ? अ. मुडीमन कमिटी ब. सायमन कमिटी क. लॉर्ड मेकॉले कमिटी ड. हंटर कमिटी
    Which Committee was appointed for inquiry into the defects of the Act of 1919 ? a. Mudiman Committee b. Simon Committee c. Lord Macaulay Committee d. Hunter Committee

    Tap an option to check your answer.

  10. 10
    लॉर्ड हार्डिंग (1844 – 48) यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले ?
    Which was the first war fought during the time of Lord Hardinge (1844 – 48) ?

    Tap an option to check your answer.

  11. 11
    भारतामध्ये प्रथम क्लोन (कृतक) पद्धतीने जन्मलेले गिर गाईच्या वासराचे नाव ______ होते.
    India's first cloned cow calf of the Gir breed was named as ______.

    Tap an option to check your answer.

  12. 12
    संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत ?
    As per UN World Agenda 2015, how many sustainable development goals are identified ?

    Tap an option to check your answer.

  13. 13
    योग्य जोड्या जुळवा.
    खनिजेउत्खनन क्षेत्र
    अ. मँगनिजi. सुरजागड
    ब. लोहखनिजii. जानोली
    क. बॉक्साईटiii. चिखला
    ड. क्रोमाईटiv. उदगिरी
    Match the following.
    MineralsMining Area
    a. Manganesei. Surjagad
    b. Iron oreii. Janoli
    c. Bauxiteiii. Chikhala
    d. Chromiteiv. Udgiri

    Tap an option to check your answer.

  14. 14
    खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ? अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा. ब. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे. क. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.
    Which of the following is not an objective of Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, 2025 ? A. Social, Physical and Economic Security of Fisherman. B. Fourfold increase in the Fisherman's income. C. Harnessing of fisheries potential in sustainable manner. D. Enhancing fish production and productivity.

    Tap an option to check your answer.

  15. 15
    यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. नद्या - सिंध, चंबळ, बेटवा, केन
    Arrange these tributaries of Yamuna river from East to West direction. Rivers – Sindh, Chambal, Betwa, Ken

    Tap an option to check your answer.

  16. 16
    महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण-2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जींग स्टेशन्स बसवले जातील ?
    At what distance along highways in Maharashtra will charging stations for electric vehicles be installed as per Maharashtra Electric Vehicle Policy-2025 ?

    Tap an option to check your answer.

  17. 17
    कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते ? (मुंबईच्या दक्षिणेकडे)
    According to Koppen's classification of the climatic regions, which type of climate is found in the western coastal region of India ? (South of Mumbai).

    Tap an option to check your answer.

  18. 18
    खालील विधानापैकी चुकीचे/ची विधान/ने कोणती/ते आहे/त ? अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपुर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे, जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे. क. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे.
    Which of the following statement/s is/are incorrect ? a. Uttarakhand, Uttar Pradesh, Bihar, West Bengal and Manipur States of India shares a border with Nepal. b. Nepal is a landlocked country which is situated between two giant countries i.e. China and India. c. Bhutan is a neighboring country of Nepal.

    Tap an option to check your answer.

  19. 19
    थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
    Which of the following is a wrong statement regarding the hill station and district ?

    Tap an option to check your answer.

  20. 20
    खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा.
    Identify the incorrect statement from the following statements.

    Tap an option to check your answer.

  21. 21
    नीती आयोग स्थापना ______ या दिवशी झाली.
    NITI Aayog was established on ______.

    Tap an option to check your answer.

  22. 22
    दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले ? अ. तेंडूलकर समिती ब. रंगराजन समिती क. विजय केळकर समिती ड. आर. एन. मल्होत्रा समिती
    Which Committee/s explained the definition of poverty line ? a. Tendulkar Committee b. Rangarajan Committee c. Vijay Kelkar Committee d. R. N. Malhotra Committee

    Tap an option to check your answer.

  23. 23
    भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ? अ. 1948 च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ब. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते. क. 1991 च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले.
    Which of the following statement regarding India's Industrial Policy is incorrect ? A. The Industrial Policy of 1948 set out the objective of establishing a mixed economy for India. B. It is seen that the 1956 Industrial Policy gave more importance to public sector industries and its development than the 1948 Industrial Policy. C. According to the 1991 policy, only 17 industries were reserved for the public sector.

    Tap an option to check your answer.

  24. 24
    राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना कधी झाली ?
    When was the National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) established ?

    Tap an option to check your answer.

  25. 25
    आर. बी. आय. च्या कोणत्या कायद्यानुसार शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँक असे वर्गीकरण केले जाते ?
    Which RBI Act classifies the Scheduled Bank and Non Scheduled Bank ?

    Tap an option to check your answer.

  26. 26
    लोकसंख्या संक्रमण सिध्दांतातील तिसरा टप्पा कोणता ? अ. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त ब. लोकसंख्येची जलदवाढ क. मृत्यूदरात लक्षणीय वाढ ड. जन्मदरात लक्षणीय घट
    Which is the third stage in the theory of demographic transition ? a. Both birth rate and death rate remain high b. Rapid growth of population c. Death rate increases significantly d. Birth rate declines significantly

    Tap an option to check your answer.

  27. 27
    खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14-08-2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील तीन प्रमुख सुधारणा योग्यरीत्या दर्शवतो ?
    Which of the following combinations correctly reflects the three key enhancements under the extended Pradhan Mantri JanDhan Yojana (PMJDY) from 14-08-2018.

    Tap an option to check your answer.

  28. 28
    1991 मध्ये स्थापन झालेली एम. नरसिम्हम् समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
    M. Narasimham Committee formed in 1991 is associated with which of the following ?

    Tap an option to check your answer.

  29. 29
    सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन (FRBM) कायद्याचा आढावा घेण्यासाठी ______ यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नियुक्त केली.
    The Government appointed a five member Committee headed by ______ in May 2016 to review the Fiscal Responsibility and Budget Management (FRBM) Act.

    Tap an option to check your answer.

  30. 30
    राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NPSM) ______ पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले.
    National Food Security Mission (NPSM) formulated in the ______ five year plan.

    Tap an option to check your answer.

  31. 31
    पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात. ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.
    Identify the correct statement/s from the following. A. The policy according to which the government plans and implements its expenditure and revenue programs to avoid adverse effects on national income, production and employment levels is called monetary policy. B. Fiscal policy gained more importance in the post Great Depression period of 1929-33 in terms of smooth functioning of the economy. J. M. Keynes contribution in this regard is significant.

    Tap an option to check your answer.

  32. 32
    पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा ?
    Find out a correct match from the following :

    Tap an option to check your answer.

  33. 33
    राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे ______. अ. स्थूल प्रजनन दर घटविणे ब. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे क. स्त्री-पुरुष (लिंगभाव) समानता आणणे ड. 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे
    The objectives of National Population Policy 2000 includes ______. a. To reduce total fertility rate b. To stabilize population by 2045 c. To bring gender equality d. To attain 100% urbanization by 2045

    Tap an option to check your answer.

  34. 34
    सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यत: स्वीकृत निकष ______ हे आहेत. अ. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. ब. भविष्यातील कर्ज - GDP गुणोत्तर आजच्या कर्ज : GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. क. भविष्यासाठी कर्ज - GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते.
    The generally accepted criteria for public debt sustainability are ______. a. Debt should be nil during specified period. b. Future debt-GDP ratio should be reduced to a certain fraction of today's debt-GDP ratio. c. The debt-GDP ratio for the future can be fixed at today's ratio.

    Tap an option to check your answer.

  35. 35
    अन्नधान्याचे बफर स्टॉक ______ करिता असतात. अ. किंमतीतील चढ-उतार मर्यादीत करण्यासाठी ब. अन्नधान्य निर्यात क. बियाणे पुरवठा ड. खुल्या बाजारात विकण्यासाठी
    The buffer stock of foodgrains are for ______. a. Moderating price fluctuations b. Export of foodgrains c. Seed supply d. Sale in open market

    Tap an option to check your answer.

  36. 36
    कोणत्या शहरात 11 वी एसिआन संरक्षण मंत्र्यांची बैठक-प्लस पार पडली ?
    In which city the 11th ASEAN Defence Minister's Meeting-Plus was held ?

    Tap an option to check your answer.

  37. 37
    अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले ?
    Who among the following was honoured with Padmapani Lifetime Achievement Award at Ajanta-Ellora Film Festival ?

    Tap an option to check your answer.

  38. 38
    1985 मध्ये विद्यापिठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाच्या पहिल्या महिला कुलगुरु म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
    Who has been appointed as the first woman Vice Chancellor of Indira Gandhi National Open University since the university's founding in 1985 ?

    Tap an option to check your answer.

  39. 39
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे ?
    What is the annual income limit set for the beneficiary of the Chief Minister's Majhi-Ladki Bahin Yojana ?

    Tap an option to check your answer.

  40. 40
    सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना “आवासाचा अधिकाराला” संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मुलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे ?
    The Supreme Court, while giving a landmark decision on September 12, 2025, aimed at protecting the interests of home buyers, declared the “Right to Housing” a fundamental right under which Article of the Constitution ?

    Tap an option to check your answer.

  41. 41
    राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्राम पंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला ?
    Which Gram Panchayat in Maharashtra was awarded the Gold Award for National E-Governance 2025 ?

    Tap an option to check your answer.

  42. 42
    निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजीटल प्लॅटफॉर्म आहे ?
    Which of the following is a unified digital platform by the Election Commission of India to simplify the electoral processes ?

    Tap an option to check your answer.

  43. 43
    राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
    Who was honoured with the 43rd Lokmanya Tilak National Award for significant contribution to National Progress ?

    Tap an option to check your answer.

  44. 44
    2025 च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला ?
    Which team was the runner-up of the Durand Cup 2025 ?

    Tap an option to check your answer.

  45. 45
    पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली. ब. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.
    Identify the correct statement/s from the following about – PM Dhan-Dhanya Krishi Yojana (PMDDKY). A. On 16th July 2025, the Union Cabinet approved the PMDDKY. B. This scheme is designed to catalyse growth in 200 agri-districts.

    Tap an option to check your answer.

  46. 46
    सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान ______ येथे झाली.
    The Second World Summit for Social Development 2025 was held in ______ from 4 to 6 November, 2025.

    Tap an option to check your answer.

  47. 47
    खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? अ. रवि अश्विन ब. हरविंदर सिंह क. आय. एम. विजयन ड. पी. आर. श्रीजेश
    Which of the following sportsmen were honoured with Padma Shri Award in 2025 ? A. Ravi Ashwin B. Harvinder Singh C. I. M. Vijayan D. P. R. Sreejesh

    Tap an option to check your answer.

  48. 48
    देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील ______ गावात सुरू केली आहे.
    First Artificial Intelligence (AI) technology based Anganwadi of the country has been launched by the Government in ______ village, Nagpur district.

    Tap an option to check your answer.

  49. 49
    हैद्राबाद येथे झालेल्या 72 व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सूचता चुआंगस्री कोणत्या देशाची आहे ?
    Opal Suchata Chuangsri, who won the Miss World Title at the 72nd Miss World 2025 Competition held in Hyderabad, belongs to which country ?

    Tap an option to check your answer.

  50. 50
    खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. अ. निसार (नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार) मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ब. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे.
    Select the correct statement/s from the following. A. NISAR (NASA-ISRO Synthetic Aperture Radar) Mission is joint project between ISRO and NASA. B. NISAR Mission's primary objectives are to study land and ice deformation, land ecosystems and oceanic regions.

    Tap an option to check your answer.

  51. 51
    लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती ______ असू शकते. अ. पूर्णपणे निवडलेली. ब. राज्य सरकार द्वारे पूर्णपणे नामनिर्देशित. क. अंशत: निवडलेली आणि अंशत: नामनिर्देशित.
    Town Area Committee is set up for the administration of a small town. It may be ______. A. Wholly elected. B. Wholly nominated by State Government. C. Partly elected and partly nominated.

    Tap an option to check your answer.

  52. 52
    सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तिय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष ______ हाच असतो.
    ______ is the President of the first Gram Sabha after the general election as well as the President of the first Gram Sabha of the financial year.

    Tap an option to check your answer.

  53. 53
    राज्यपालाकडे भारतीय राज्य घटनेतील अनुच्छेद ______ नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपविण्यात आली आहे.
    The executive power of the State shall be vested in the Governor under Article ______ of the Indian Constitution.

    Tap an option to check your answer.

  54. 54
    खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही ?
    Which of the following pair is not correctly matched ?

    Tap an option to check your answer.

  55. 55
    पोलिस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे ?
    Who has the authority to appoint Police Patil ?

    Tap an option to check your answer.

  56. 56
    खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत ?
    Which of the following High Court has the largest number of Benches ?

    Tap an option to check your answer.

  57. 57
    कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे ?
    Which Schedule includes the list of the official languages of India ?

    Tap an option to check your answer.

  58. 58
    केंद्र सरकारने 44 व्या घटनादुरूस्तीद्वारे ______ संविधानाच्या तिसऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला.
    The Central Government taken out the ______ from Part III of Constitution i.e. the list of fundamental rights by the 44th Constitutional Amendment.

    Tap an option to check your answer.

  59. 59
    केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला 'संधिप्रकाश क्षेत्र (Twilight Zone)' असे कोण संबोधतात ?
    Who described the Concurrent list of the Central and the States as a 'Twilight Zone' ?

    Tap an option to check your answer.

  60. 60
    खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा. अ. एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. ब. एस.एन. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. क. प्रेम बिहारी नारायण रायझादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते.
    Select the incorrect statement/s from the following. A. H.V.R. Iyengar was the Chief Draftsman of the Constituent Assembly. B. S.N. Mukherjee was the Secretary to the Constituent Assembly. C. Prem Bihari Narayan Raizada was the Calligrapher of the Indian Constitution.

    Tap an option to check your answer.

  61. 61
    खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा (राज्य विधिमंडळ). अ. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते. ब. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते.
    Select the correct statement/s from the following (State Legislature). A. Ordinary Bills can be introduced by a minister or by private member. B. Money Bills can be introduced by a minister or by private member.

    Tap an option to check your answer.

  62. 62
    बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. अ. ग्राम पंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. ब. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. क. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत.
    Select the correct recommendations of the Balwantrai Mehta Committee. A. The Village Panchayat should be constituted with directly elected representatives. B. Panchayat Samiti and Zilla Parishad should be constituted with directly elected representatives. C. The District Collector should be the Chairman of the Zilla Parishad.

    Tap an option to check your answer.

  63. 63
    खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतुद करण्यात आली आहे ?
    The provision of preventive detention is found in which of the following lists ?

    Tap an option to check your answer.

  64. 64
    लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते ?
    Which High Court has Jurisdiction over Lakshadweep ?

    Tap an option to check your answer.

  65. 65
    खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
    Which of the following statement is not true ?

    Tap an option to check your answer.

  66. 66
    खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही ?
    Which of the following is not the adverse effect of hydroelectric power plant ?

    Tap an option to check your answer.

  67. 67
    एका घरामध्ये एक 100 W क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो, दोन 50 W क्षमतेचे बल्ब दररोज पाच तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट (kWh) 5 रूपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीजबील किती रूपये येईल ?
    A house uses 1 fan of 100 W for 10 hours/day, 2 bulbs of 50 W each 5 hours/day. If electricity costs ₹ 5 per unit (kWh), calculate the monthly electricity bill for 30 days.

    Tap an option to check your answer.

  68. 68
    खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सान्निध्यात दिशा बदलत नाहीत ?
    Which of the following rays will not change direction in presence of magnetic field ?

    Tap an option to check your answer.

  69. 69
    पितळ हा ______ मिश्रधातू आहे.
    Brass is an alloy of ______.

    Tap an option to check your answer.

  70. 70
    मॅलाकाईट हे ______ धातूचे मूळ (ore) आहे.
    Malachite is ore of ______.

    Tap an option to check your answer.

  71. 71
    कॅल्शियम आणि क्लोरीन ______ बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते.
    Calcium and chlorine combine to form calcium chloride by ______.

    Tap an option to check your answer.

  72. 72
    खालीलपैकी कोणत्या झूऑईड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते ?
    Which one of the following zooids in Cnidarians have protective cover ?

    Tap an option to check your answer.

  73. 73
    कांगारु हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे, - अ. ऑस्ट्रेलीया आणि टास्मानिया च्या गवताळ मैदानात आढळतो. ब. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. क. पुढील पाय खूप लांब व शक्तीशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. ड. मादीला भ्रुणपिशवी असते तीला मार्सुपिअम म्हणतात. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    Kangaroo is a pouched mammal, – a. Found in Australia and Tasmania on grassy plains. b. It is terrestrial and herbivorous. c. Fore limbs are very long and powerful while hind limbs are very short and weak. d. Females have a brood pouch known as Marsupium. Which of the statement/s given above is/are correct ?

    Tap an option to check your answer.

  74. 74
    घातक सबटर्शियन मलेरिया ______ होतो.
    Malignant subtertian malaria is caused by ______.

    Tap an option to check your answer.

  75. 75
    शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म-जीवाणूंच्या मदतीने करू शकतात ? अ. रायझोबियम ब. विषाणू क. बुरशी ड. प्रोटोझोआ
    With the help of which micro-organism leguminous plants absorb nitrogen from air ? a. Rhizobium b. Virus c. Fungus d. Protozoa

    Tap an option to check your answer.

  76. 76
    भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो ?
    Which is the causal organism of Tikka disease of Groundnut ?

    Tap an option to check your answer.

  77. 77
    मिराबिलीस जलापा (फोर ओ'क्लॉक) ही वनस्पती ______ कुळातील आहे.
    Mirabilis jalapa (four o'clock) plant belongs to ______ family.

    Tap an option to check your answer.

  78. 78
    खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते ?
    Which of the following is natural blood anticoagulant medicine ?

    Tap an option to check your answer.

  79. 79
    विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा.
    रोगविषाणू
    a. एडस्I. डेंग्यू विषाणू
    b. कांजिण्याII. हिपॅटाईटीस बी विषाणू
    c. लिव्हर डॅमेज व सिरोसिसIII. व्हेरिसेला झोस्टर विषाणू
    d. रक्तस्त्रावी तापIV. मानवी इम्यूनोडेफीसीयन्सी विषाणू
    योग्य पर्याय निवडा.
    Match the viral diseases and causative viruses.
    DiseaseVirus
    a. AIDSI. Dengue virus
    b. ChickenpoxII. Hepatitis B virus
    c. Liver damage and cirrhosisIII. Varicella-zoster virus
    d. Hemorrhagic feverIV. Human Immunodeficiency virus
    Choose correct option.

    Tap an option to check your answer.

  80. 80
    मानवी रक्तामध्ये 'प्लाझ्मा' किती टक्के असतो ?
    How much % of 'plasma' is present in human blood ?

    Tap an option to check your answer.

  81. 81
    एका संख्येची चार-पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती ?
    If four-fifth of a number is greater than 60% of that number by 10, then what is that number ?

    Tap an option to check your answer.

  82. 82
    मिश्रधातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4 : 3 आणि 9 : 5 आहे. हे दोन्ही मिश्रधातू समान प्रमाणात मिसळून C मिश्रधातू तयार केल्यास, त्या C मिश्रधातूमधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल ?
    In alloys A and B, copper and zinc are present in the ratio 4 : 3 and 9 : 5 respectively. If equal parts of both alloys are mixed to form a new alloy C, what will be the ratio of copper to zinc in alloy C ?

    Tap an option to check your answer.

  83. 83
    सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम तीन वर्षांत 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली, तर याच मूळ रकमेचे तीन वर्षानंतर किती रुपये होतील ?
    A sum of Rs. 5,000 amounts to Rs. 5,600 in three years at simple interest. If the rate of interest is increased by 3%, what will be the amount of the same sum in three years ?

    Tap an option to check your answer.

  84. 84
    10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
    10 women can complete a work in 7 days. 10 children take 14 days to complete the same work. How many days 5 women and 10 children will take to complete the same work ?

    Tap an option to check your answer.

  85. 85
    दोन क्रमागत विषम संख्याच्या वर्गातील फरक 112 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती ?
    The difference between the squares of two consecutive odd numbers is 112. What is the square of the smaller number ?

    Tap an option to check your answer.

  86. 86
    खालील किंमत काढा, - (0.11)2−(0.01)21.2=\dfrac{(0.11)^2 - (0.01)^2}{1.2} = ______.
    Find the value of following, – (0.11)2−(0.01)21.2=\dfrac{(0.11)^2 - (0.01)^2}{1.2} = ______.

    Tap an option to check your answer.

  87. 87
    खालील स्तंभालेखावरून, वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले ?
    वर्षउत्पादन
    19763000
    19772500
    19782000
    19791000
    1980500
    From the following Histogram, what percent of decrease in production occurs from year 1976 to 1980 ?
    YearProduction
    19763000
    19772500
    19782000
    19791000
    1980500

    Tap an option to check your answer.

  88. 88
    जर चौरसाची बाजु 25% ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल ?
    If the side of square is increased by 25%, then its area will be increased by what percentage ?

    Tap an option to check your answer.

  89. 89
    मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किमी आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7.30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किमी/तास आणि 75 किमी/तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ?
    The distance between Mumbai and Goa is 540 km. Two trains start running at the same time in the morning at 7.30 a.m. in opposite directions from these two stations with speed of 60 km/hr and 75 km/hr respectively. At what time will they cross each other ?

    Tap an option to check your answer.

  90. 90
    एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सुट देतो. तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹ 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती ?
    A shopkeeper offers 25% discount on the printed price of a cupboard, yet he make 15% profit. If printed price of the cupboard is ₹ 23,000 then, what is the purchase price of it ?

    Tap an option to check your answer.

  91. 91
    आदित घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर, तो उजवीकडे वळतो आणि थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो. शेवटी, एक किलोमीटर चालल्यानंतर, तो पुन्हा डावीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे ?
    Aadit walks northwards from his house. After a while, he turns to his right and a little further to his left. Finally, after walking a distance of one kilometer, he turns to his left again. In which direction, he is moving now ?

    Tap an option to check your answer.

  92. 92
    राम, शाम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल ?
    The average age of Ram, Sham and John 5 years ago was 16 years. What will be their average age after 5 years ?

    Tap an option to check your answer.

  93. 93
    खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षरमालिका पूर्ण करेल ? aa _ aaa _ aaaa _ aaaa _ b
    Which of the following alternative will complete the letter series ? aa _ aaa _ aaaa _ aaaa _ b

    Tap an option to check your answer.

  94. 94
    खालील अंकमालिका पूर्ण करा. 3.75, 5.00, 6.25, 7.50, 8.75, ?
    Complete the following number series. 3.75, 5.00, 6.25, 7.50, 8.75, ?

    Tap an option to check your answer.

  95. 95
    विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो, हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे ?
    A student collects old data, compare it with new findings, identifies errors and proposes new conclusion. Which mental process does this represent ?

    Tap an option to check your answer.

  96. 96
    खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 170, 197, 226, 257, ?
    Which number will come at the place of question mark in the following number series ? 170, 197, 226, 257, ?

    Tap an option to check your answer.

  97. 97
    खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
    How many triangles are in the following figure ?

    Tap an option to check your answer.

  98. 98
    स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 36\frac{3}{6}वा भाग वाचला असेल, तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत ?
    If Spandan has read 36th\frac{3}{6}^{\text{th}} part of a book of 120 pages, then how many pages of that book he did not read ?

    Tap an option to check your answer.

  99. 99
    एका सांकेतिक भाषेत 'THANKS' ला 'SKNTHA'असे लिहिले, तर त्याच सांकेतिक भाषेत 'STUPID' ला कसे लिहाल ?
    In a certain code language, 'THANKS' is written as 'SKNTHA'. How will you write, 'STUPID' in that code language ?

    Tap an option to check your answer.

  100. 100
    रानी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दिप्ती अशा दोन मुली आहेत. दिप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहिण आहे, जिचे लग्न हर्षित सोबत झाले आहे आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी दोन मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे, तर दिप्ती आणि कोमल यांचे नाते काय ?
    Rani and Suresh are a married couple have two daughters Medha and Deepti. Deepti is married to Anurag who is the son of Gareema and Tushar. Nidhi is the daughter of Anurag. Komal who is Anurag's sister is married with Harshit and has two sons, Aman and Prem. Prem is the grandson of Garima and Tushar, what is relation between Deepti and Komal ?

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock