उतारा आकलन (Comprehension)
15 MPSC State Services Mains Marathi past-year questions from 3 papers, 2016 to 2018, with answers and worked solutions.
- Difficulty: 9 easy · 6 moderate.
- Most-asked subtopic: उतारा (15).
- Updated 27 September 2026.
#1उतारा
खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 या प्रश्नांची उत्तरे द्या. 'मी' हा हृदयघातकी दिसतो ! पण का ? माणसाला इतरांपासून वेगळं पाडणाऱ्या गोष्टी एकटेपण व ताण निर्माण करतात व त्यातून बरेचदा हृदयरोग निर्माण होतो. याउलट माणसा-माणसांत प्रेम व नातं निर्माण करणाऱ्या गोष्टी, माणसाला निसर्गाशी, जगाशी जोडणाऱ्या गोष्टी माणसाच्या हृदयाला वाचवतात. माणसांचं माणसांशी तर सोडाच, पाळीव प्राणी व झाडांशी असलेलं भावनिक नातं देखील माणसाला हृदयरोगापासून संरक्षण देतं, असं वैज्ञानिक अध्ययनात आढळलं आहे. संबंध (relationship) माणसाला हवासा वाटतो, नव्हे ती त्याच्या जगण्याची मूलभूत गरज आहे असं एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणतो. व्यक्तिकेंद्रित व स्पर्धेच्या आधुनिक (म्हणजे अमेरिकन) सभ्यतेत माणूस एकटा पडत जातो. गर्दीत असूनही एकटा, एकमेकांविरुद्ध स्पर्धक. घराबाहेर व्यावसायिक स्पर्धा, घरातही पती-पत्नीची एकाच भूमिकेसाठी, प्रभुत्वासाठी स्पर्धा. शेवटी अधिक यशासाठी स्वत:शी देखील स्पर्धा. या स्पर्धेचा सतत ताण. सर्वांशी तुटलेलं नातं. या संस्कृतीत जगण्यासाठी माणसाला 'मी' व 'माझं' यांचाच जप करावा लागतो. 'मी' हीच सर्वात मोठी विभूती होऊन तिचीच पूजा दिवस-रात्र चालते. विकसित देशांपासून आम्ही उचललेली स्पर्धात्मक ('मुक्त'?) अर्थव्यवस्था यशस्वी होण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वार्थाला, लोभाला व महत्त्वाकांक्षेला भडकवावं लागतं, त्यात तेल ओतावं लागतं. स्वार्थ व लोभमूलक प्रेरणेतून 'प्रगती' साठी जिवापाड धावतांना जो मानसिक ताण निर्माण होतो, तो हृदयरोग निर्माण करतो. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधे स्पर्धेचं जीवन जगणाऱ्यांना तर हे लागू पडतंच; पण गडचिरोलीच्या जंगलात जाऊन आरोग्याचं काम करणारा 'समाजसेवक' देखील यातून वाचू शकला नव्हता. मी मोठा किंवा यशस्वी होणं म्हणजे मी इतरांपेक्षा कसा वेगळा, विशेष किंवा अधिक संपन्न हे सिद्ध करणं. इतरांसारखं, इतरांपैकी एक होणं म्हणजे साधारण होणं. असाधारण होण्यासाठी मला वेगळं बनावं लागतं. इतरांसोबतच्या माझ्या साधर्म्याऐवजी वेगळेपणावर भर द्यावा लागतो. यातूनच माझं एकलेपण निर्माण होतं, वाढतं. इतरांमधे व माझ्यामधे वेगळेपणाची पक्की भिंत तयार होते व ती भिंत बांधणारा मी स्वत:च त्या भिंतीच्या आत एकटा कैदी बनतो. कुणापासूनही असलं तरी एकटेपण घातक ठरतं. हृदयाला मारक ठरतं. अचानक माझ्या रोगाचं कारण मला लख्ख दिसायला लागलं ! अनेक वर्षांपूर्वी केव्हातरी, न कळत, मी माझं नैसर्गिक जीवन व प्रसन्न मन या आधुनिक संस्कृतीच्या हवाली केलं. त्यातून प्रथम शरीराचा उपयोग थांबला व त्याच्याकडे दुर्लक्ष सुरू झालं. मग अधिक काम व यश प्राप्तीच्या मागे लागून मनाची सहज अवस्था सुटली. बुद्धी व विचारांच्या वाळवंटात भावनिक अनुभव पारखा झाला. प्रसन्नता गेली. पुढे मनामधे 'मी व माझं' वाढत गेलं. त्यांचच कुंपण स्वत:भोवती निर्माण झालं व विश्वाशी असलेली एकरूपता तुटली आणि आश्चर्य म्हणजे विश्वस्वरूपाशी नाळ तुटल्यावर स्वत:शी असलेला संपर्कही सुटला. माझं स्वत:शीच नातं तुटलं होतं. माझं घर हरवलं होतं. माझ्या एकसंध निरोगी जीवनाचे तुकडे तुकडे पडले होते.#2उतारा
खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 या प्रश्नांची उत्तरे द्या. 'मी' हा हृदयघातकी दिसतो ! पण का ? माणसाला इतरांपासून वेगळं पाडणाऱ्या गोष्टी एकटेपण व ताण निर्माण करतात व त्यातून बरेचदा हृदयरोग निर्माण होतो. याउलट माणसा-माणसांत प्रेम व नातं निर्माण करणाऱ्या गोष्टी, माणसाला निसर्गाशी, जगाशी जोडणाऱ्या गोष्टी माणसाच्या हृदयाला वाचवतात. माणसांचं माणसांशी तर सोडाच, पाळीव प्राणी व झाडांशी असलेलं भावनिक नातं देखील माणसाला हृदयरोगापासून संरक्षण देतं, असं वैज्ञानिक अध्ययनात आढळलं आहे. संबंध (relationship) माणसाला हवासा वाटतो, नव्हे ती त्याच्या जगण्याची मूलभूत गरज आहे असं एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणतो. व्यक्तिकेंद्रित व स्पर्धेच्या आधुनिक (म्हणजे अमेरिकन) सभ्यतेत माणूस एकटा पडत जातो. गर्दीत असूनही एकटा, एकमेकांविरुद्ध स्पर्धक. घराबाहेर व्यावसायिक स्पर्धा, घरातही पती-पत्नीची एकाच भूमिकेसाठी, प्रभुत्वासाठी स्पर्धा. शेवटी अधिक यशासाठी स्वत:शी देखील स्पर्धा. या स्पर्धेचा सतत ताण. सर्वांशी तुटलेलं नातं. या संस्कृतीत जगण्यासाठी माणसाला 'मी' व 'माझं' यांचाच जप करावा लागतो. 'मी' हीच सर्वात मोठी विभूती होऊन तिचीच पूजा दिवस-रात्र चालते. विकसित देशांपासून आम्ही उचललेली स्पर्धात्मक ('मुक्त'?) अर्थव्यवस्था यशस्वी होण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वार्थाला, लोभाला व महत्त्वाकांक्षेला भडकवावं लागतं, त्यात तेल ओतावं लागतं. स्वार्थ व लोभमूलक प्रेरणेतून 'प्रगती' साठी जिवापाड धावतांना जो मानसिक ताण निर्माण होतो, तो हृदयरोग निर्माण करतो. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधे स्पर्धेचं जीवन जगणाऱ्यांना तर हे लागू पडतंच; पण गडचिरोलीच्या जंगलात जाऊन आरोग्याचं काम करणारा 'समाजसेवक' देखील यातून वाचू शकला नव्हता. मी मोठा किंवा यशस्वी होणं म्हणजे मी इतरांपेक्षा कसा वेगळा, विशेष किंवा अधिक संपन्न हे सिद्ध करणं. इतरांसारखं, इतरांपैकी एक होणं म्हणजे साधारण होणं. असाधारण होण्यासाठी मला वेगळं बनावं लागतं. इतरांसोबतच्या माझ्या साधर्म्याऐवजी वेगळेपणावर भर द्यावा लागतो. यातूनच माझं एकलेपण निर्माण होतं, वाढतं. इतरांमधे व माझ्यामधे वेगळेपणाची पक्की भिंत तयार होते व ती भिंत बांधणारा मी स्वत:च त्या भिंतीच्या आत एकटा कैदी बनतो. कुणापासूनही असलं तरी एकटेपण घातक ठरतं. हृदयाला मारक ठरतं. अचानक माझ्या रोगाचं कारण मला लख्ख दिसायला लागलं ! अनेक वर्षांपूर्वी केव्हातरी, न कळत, मी माझं नैसर्गिक जीवन व प्रसन्न मन या आधुनिक संस्कृतीच्या हवाली केलं. त्यातून प्रथम शरीराचा उपयोग थांबला व त्याच्याकडे दुर्लक्ष सुरू झालं. मग अधिक काम व यश प्राप्तीच्या मागे लागून मनाची सहज अवस्था सुटली. बुद्धी व विचारांच्या वाळवंटात भावनिक अनुभव पारखा झाला. प्रसन्नता गेली. पुढे मनामधे 'मी व माझं' वाढत गेलं. त्यांचच कुंपण स्वत:भोवती निर्माण झालं व विश्वाशी असलेली एकरूपता तुटली आणि आश्चर्य म्हणजे विश्वस्वरूपाशी नाळ तुटल्यावर स्वत:शी असलेला संपर्कही सुटला. माझं स्वत:शीच नातं तुटलं होतं. माझं घर हरवलं होतं. माझ्या एकसंध निरोगी जीवनाचे तुकडे तुकडे पडले होते.#3उतारा
खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 या प्रश्नांची उत्तरे द्या. 'मी' हा हृदयघातकी दिसतो ! पण का ? माणसाला इतरांपासून वेगळं पाडणाऱ्या गोष्टी एकटेपण व ताण निर्माण करतात व त्यातून बरेचदा हृदयरोग निर्माण होतो. याउलट माणसा-माणसांत प्रेम व नातं निर्माण करणाऱ्या गोष्टी, माणसाला निसर्गाशी, जगाशी जोडणाऱ्या गोष्टी माणसाच्या हृदयाला वाचवतात. माणसांचं माणसांशी तर सोडाच, पाळीव प्राणी व झाडांशी असलेलं भावनिक नातं देखील माणसाला हृदयरोगापासून संरक्षण देतं, असं वैज्ञानिक अध्ययनात आढळलं आहे. संबंध (relationship) माणसाला हवासा वाटतो, नव्हे ती त्याच्या जगण्याची मूलभूत गरज आहे असं एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणतो. व्यक्तिकेंद्रित व स्पर्धेच्या आधुनिक (म्हणजे अमेरिकन) सभ्यतेत माणूस एकटा पडत जातो. गर्दीत असूनही एकटा, एकमेकांविरुद्ध स्पर्धक. घराबाहेर व्यावसायिक स्पर्धा, घरातही पती-पत्नीची एकाच भूमिकेसाठी, प्रभुत्वासाठी स्पर्धा. शेवटी अधिक यशासाठी स्वत:शी देखील स्पर्धा. या स्पर्धेचा सतत ताण. सर्वांशी तुटलेलं नातं. या संस्कृतीत जगण्यासाठी माणसाला 'मी' व 'माझं' यांचाच जप करावा लागतो. 'मी' हीच सर्वात मोठी विभूती होऊन तिचीच पूजा दिवस-रात्र चालते. विकसित देशांपासून आम्ही उचललेली स्पर्धात्मक ('मुक्त'?) अर्थव्यवस्था यशस्वी होण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वार्थाला, लोभाला व महत्त्वाकांक्षेला भडकवावं लागतं, त्यात तेल ओतावं लागतं. स्वार्थ व लोभमूलक प्रेरणेतून 'प्रगती' साठी जिवापाड धावतांना जो मानसिक ताण निर्माण होतो, तो हृदयरोग निर्माण करतो. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधे स्पर्धेचं जीवन जगणाऱ्यांना तर हे लागू पडतंच; पण गडचिरोलीच्या जंगलात जाऊन आरोग्याचं काम करणारा 'समाजसेवक' देखील यातून वाचू शकला नव्हता. मी मोठा किंवा यशस्वी होणं म्हणजे मी इतरांपेक्षा कसा वेगळा, विशेष किंवा अधिक संपन्न हे सिद्ध करणं. इतरांसारखं, इतरांपैकी एक होणं म्हणजे साधारण होणं. असाधारण होण्यासाठी मला वेगळं बनावं लागतं. इतरांसोबतच्या माझ्या साधर्म्याऐवजी वेगळेपणावर भर द्यावा लागतो. यातूनच माझं एकलेपण निर्माण होतं, वाढतं. इतरांमधे व माझ्यामधे वेगळेपणाची पक्की भिंत तयार होते व ती भिंत बांधणारा मी स्वत:च त्या भिंतीच्या आत एकटा कैदी बनतो. कुणापासूनही असलं तरी एकटेपण घातक ठरतं. हृदयाला मारक ठरतं. अचानक माझ्या रोगाचं कारण मला लख्ख दिसायला लागलं ! अनेक वर्षांपूर्वी केव्हातरी, न कळत, मी माझं नैसर्गिक जीवन व प्रसन्न मन या आधुनिक संस्कृतीच्या हवाली केलं. त्यातून प्रथम शरीराचा उपयोग थांबला व त्याच्याकडे दुर्लक्ष सुरू झालं. मग अधिक काम व यश प्राप्तीच्या मागे लागून मनाची सहज अवस्था सुटली. बुद्धी व विचारांच्या वाळवंटात भावनिक अनुभव पारखा झाला. प्रसन्नता गेली. पुढे मनामधे 'मी व माझं' वाढत गेलं. त्यांचच कुंपण स्वत:भोवती निर्माण झालं व विश्वाशी असलेली एकरूपता तुटली आणि आश्चर्य म्हणजे विश्वस्वरूपाशी नाळ तुटल्यावर स्वत:शी असलेला संपर्कही सुटला. माझं स्वत:शीच नातं तुटलं होतं. माझं घर हरवलं होतं. माझ्या एकसंध निरोगी जीवनाचे तुकडे तुकडे पडले होते.#4उतारा
खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 या प्रश्नांची उत्तरे द्या. 'मी' हा हृदयघातकी दिसतो ! पण का ? माणसाला इतरांपासून वेगळं पाडणाऱ्या गोष्टी एकटेपण व ताण निर्माण करतात व त्यातून बरेचदा हृदयरोग निर्माण होतो. याउलट माणसा-माणसांत प्रेम व नातं निर्माण करणाऱ्या गोष्टी, माणसाला निसर्गाशी, जगाशी जोडणाऱ्या गोष्टी माणसाच्या हृदयाला वाचवतात. माणसांचं माणसांशी तर सोडाच, पाळीव प्राणी व झाडांशी असलेलं भावनिक नातं देखील माणसाला हृदयरोगापासून संरक्षण देतं, असं वैज्ञानिक अध्ययनात आढळलं आहे. संबंध (relationship) माणसाला हवासा वाटतो, नव्हे ती त्याच्या जगण्याची मूलभूत गरज आहे असं एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणतो. व्यक्तिकेंद्रित व स्पर्धेच्या आधुनिक (म्हणजे अमेरिकन) सभ्यतेत माणूस एकटा पडत जातो. गर्दीत असूनही एकटा, एकमेकांविरुद्ध स्पर्धक. घराबाहेर व्यावसायिक स्पर्धा, घरातही पती-पत्नीची एकाच भूमिकेसाठी, प्रभुत्वासाठी स्पर्धा. शेवटी अधिक यशासाठी स्वत:शी देखील स्पर्धा. या स्पर्धेचा सतत ताण. सर्वांशी तुटलेलं नातं. या संस्कृतीत जगण्यासाठी माणसाला 'मी' व 'माझं' यांचाच जप करावा लागतो. 'मी' हीच सर्वात मोठी विभूती होऊन तिचीच पूजा दिवस-रात्र चालते. विकसित देशांपासून आम्ही उचललेली स्पर्धात्मक ('मुक्त'?) अर्थव्यवस्था यशस्वी होण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वार्थाला, लोभाला व महत्त्वाकांक्षेला भडकवावं लागतं, त्यात तेल ओतावं लागतं. स्वार्थ व लोभमूलक प्रेरणेतून 'प्रगती' साठी जिवापाड धावतांना जो मानसिक ताण निर्माण होतो, तो हृदयरोग निर्माण करतो. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधे स्पर्धेचं जीवन जगणाऱ्यांना तर हे लागू पडतंच; पण गडचिरोलीच्या जंगलात जाऊन आरोग्याचं काम करणारा 'समाजसेवक' देखील यातून वाचू शकला नव्हता. मी मोठा किंवा यशस्वी होणं म्हणजे मी इतरांपेक्षा कसा वेगळा, विशेष किंवा अधिक संपन्न हे सिद्ध करणं. इतरांसारखं, इतरांपैकी एक होणं म्हणजे साधारण होणं. असाधारण होण्यासाठी मला वेगळं बनावं लागतं. इतरांसोबतच्या माझ्या साधर्म्याऐवजी वेगळेपणावर भर द्यावा लागतो. यातूनच माझं एकलेपण निर्माण होतं, वाढतं. इतरांमधे व माझ्यामधे वेगळेपणाची पक्की भिंत तयार होते व ती भिंत बांधणारा मी स्वत:च त्या भिंतीच्या आत एकटा कैदी बनतो. कुणापासूनही असलं तरी एकटेपण घातक ठरतं. हृदयाला मारक ठरतं. अचानक माझ्या रोगाचं कारण मला लख्ख दिसायला लागलं ! अनेक वर्षांपूर्वी केव्हातरी, न कळत, मी माझं नैसर्गिक जीवन व प्रसन्न मन या आधुनिक संस्कृतीच्या हवाली केलं. त्यातून प्रथम शरीराचा उपयोग थांबला व त्याच्याकडे दुर्लक्ष सुरू झालं. मग अधिक काम व यश प्राप्तीच्या मागे लागून मनाची सहज अवस्था सुटली. बुद्धी व विचारांच्या वाळवंटात भावनिक अनुभव पारखा झाला. प्रसन्नता गेली. पुढे मनामधे 'मी व माझं' वाढत गेलं. त्यांचच कुंपण स्वत:भोवती निर्माण झालं व विश्वाशी असलेली एकरूपता तुटली आणि आश्चर्य म्हणजे विश्वस्वरूपाशी नाळ तुटल्यावर स्वत:शी असलेला संपर्कही सुटला. माझं स्वत:शीच नातं तुटलं होतं. माझं घर हरवलं होतं. माझ्या एकसंध निरोगी जीवनाचे तुकडे तुकडे पडले होते.#5उतारा
खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 या प्रश्नांची उत्तरे द्या. 'मी' हा हृदयघातकी दिसतो ! पण का ? माणसाला इतरांपासून वेगळं पाडणाऱ्या गोष्टी एकटेपण व ताण निर्माण करतात व त्यातून बरेचदा हृदयरोग निर्माण होतो. याउलट माणसा-माणसांत प्रेम व नातं निर्माण करणाऱ्या गोष्टी, माणसाला निसर्गाशी, जगाशी जोडणाऱ्या गोष्टी माणसाच्या हृदयाला वाचवतात. माणसांचं माणसांशी तर सोडाच, पाळीव प्राणी व झाडांशी असलेलं भावनिक नातं देखील माणसाला हृदयरोगापासून संरक्षण देतं, असं वैज्ञानिक अध्ययनात आढळलं आहे. संबंध (relationship) माणसाला हवासा वाटतो, नव्हे ती त्याच्या जगण्याची मूलभूत गरज आहे असं एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणतो. व्यक्तिकेंद्रित व स्पर्धेच्या आधुनिक (म्हणजे अमेरिकन) सभ्यतेत माणूस एकटा पडत जातो. गर्दीत असूनही एकटा, एकमेकांविरुद्ध स्पर्धक. घराबाहेर व्यावसायिक स्पर्धा, घरातही पती-पत्नीची एकाच भूमिकेसाठी, प्रभुत्वासाठी स्पर्धा. शेवटी अधिक यशासाठी स्वत:शी देखील स्पर्धा. या स्पर्धेचा सतत ताण. सर्वांशी तुटलेलं नातं. या संस्कृतीत जगण्यासाठी माणसाला 'मी' व 'माझं' यांचाच जप करावा लागतो. 'मी' हीच सर्वात मोठी विभूती होऊन तिचीच पूजा दिवस-रात्र चालते. विकसित देशांपासून आम्ही उचललेली स्पर्धात्मक ('मुक्त'?) अर्थव्यवस्था यशस्वी होण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वार्थाला, लोभाला व महत्त्वाकांक्षेला भडकवावं लागतं, त्यात तेल ओतावं लागतं. स्वार्थ व लोभमूलक प्रेरणेतून 'प्रगती' साठी जिवापाड धावतांना जो मानसिक ताण निर्माण होतो, तो हृदयरोग निर्माण करतो. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधे स्पर्धेचं जीवन जगणाऱ्यांना तर हे लागू पडतंच; पण गडचिरोलीच्या जंगलात जाऊन आरोग्याचं काम करणारा 'समाजसेवक' देखील यातून वाचू शकला नव्हता. मी मोठा किंवा यशस्वी होणं म्हणजे मी इतरांपेक्षा कसा वेगळा, विशेष किंवा अधिक संपन्न हे सिद्ध करणं. इतरांसारखं, इतरांपैकी एक होणं म्हणजे साधारण होणं. असाधारण होण्यासाठी मला वेगळं बनावं लागतं. इतरांसोबतच्या माझ्या साधर्म्याऐवजी वेगळेपणावर भर द्यावा लागतो. यातूनच माझं एकलेपण निर्माण होतं, वाढतं. इतरांमधे व माझ्यामधे वेगळेपणाची पक्की भिंत तयार होते व ती भिंत बांधणारा मी स्वत:च त्या भिंतीच्या आत एकटा कैदी बनतो. कुणापासूनही असलं तरी एकटेपण घातक ठरतं. हृदयाला मारक ठरतं. अचानक माझ्या रोगाचं कारण मला लख्ख दिसायला लागलं ! अनेक वर्षांपूर्वी केव्हातरी, न कळत, मी माझं नैसर्गिक जीवन व प्रसन्न मन या आधुनिक संस्कृतीच्या हवाली केलं. त्यातून प्रथम शरीराचा उपयोग थांबला व त्याच्याकडे दुर्लक्ष सुरू झालं. मग अधिक काम व यश प्राप्तीच्या मागे लागून मनाची सहज अवस्था सुटली. बुद्धी व विचारांच्या वाळवंटात भावनिक अनुभव पारखा झाला. प्रसन्नता गेली. पुढे मनामधे 'मी व माझं' वाढत गेलं. त्यांचच कुंपण स्वत:भोवती निर्माण झालं व विश्वाशी असलेली एकरूपता तुटली आणि आश्चर्य म्हणजे विश्वस्वरूपाशी नाळ तुटल्यावर स्वत:शी असलेला संपर्कही सुटला. माझं स्वत:शीच नातं तुटलं होतं. माझं घर हरवलं होतं. माझ्या एकसंध निरोगी जीवनाचे तुकडे तुकडे पडले होते.Done a few? Here’s your next move
#6उतारा
पुढील उतारा वाचून प्र.क्र. 46 ते 50 ची उत्तरे लिहा - भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपाचा अभ्यास ही समजूत अलीकडेपर्यंत रूढ होती. प्रगत भाषांना बोली आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात, हे खरे असले तरी, सर्वच भाषांना लिपी असते असे नाही. जगातील भाषांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की बऱ्याचशा भाषांना लिपी नाही, तरी संप्रेषणाचे कार्य त्या करू शकतात. आपल्याकडल्या अशिक्षित माणसाला लिहिता-वाचता आले नाही तरी तो भाषा वापरतच असतो. याचा अर्थ हा की 'बोलणे' हे भाषेचे मुख्य रूप आहे. 'लिहिणे' हे भाषेचे दुय्यम आणि नंतर निर्माण केले गेलेले रूप आहे. लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे. लिपीवरून भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतोच असे नाही. लिखित रूपाच्या पलीकडे भाषेचे कितीतरी वेगवेगळे वापर असतात. भाषाविज्ञानाला या साऱ्यांचा विचार करायचा असतो. म्हणून आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या बोली (औच्चारिक) रूपाचा अभ्यास करण्यावर भर देते. त्यामुळेच टेपरेकॉर्डरसारखी साधने वापरून भाषेचे औच्चारिक नमुने गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे ही पद्धत शास्त्रशुद्ध मानली जाते. भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास ही अशीच एक गैरसमजूत आहे. साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रांत भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे. कुटुंबातील माणसांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलताना भाषेचे अगदी अनौपचारिक रूप आपण वापरत असतो. सभेत भाषण देताना किंवा वर्गात शिकवताना भाषेची वेगवेगळी पण औपचारिक रूपे वापरली जातात. व्यापार उद्योगांसारख्या क्षेत्रांत भाषेचे व्यावहारिक रूप आपल्याला बघायला मिळते. शासकीय व्यवहार, कोर्टकचेऱ्या, जाहिरात-विभाग इत्यादी ठिकाणी भाषेचा वापर कसा करायचा याची विशिष्ट तंत्रे ठरलेली असतात. साहित्यापलीकडे भाषेची अशी जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषेचे समग्र स्वरूप समजावून घेण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात केला जाणारा भाषेचा वापर अभ्यासणे आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलत असते. जात, व्यवसाय यांनुसारही भाषेची रूपे बदलताना दिसतात. यातून एकाच भाषेत भाषाभेद निर्माण होत राहतात. भाषेचा अभ्यास करताना भाषाभेदांचा विचार करावा लागतो. आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक सत्ता हाती असलेला प्रतिष्ठितांचा वर्ग समाजावर नेहमी वर्चस्व गाजवून असतो. प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजवणाऱ्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा आणि समाजातील अन्य वर्गांची भाषा म्हणजे अशुद्ध, असंस्कृत आणि अप्रगत भाषा, हा भाषेबद्दलचा गैरसमजच आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर पुण्याच्या ब्राह्मण वर्गाची भाषा शुद्ध आणि कुणबी किंवा कोळी यांची भाषा अशुद्ध ही कल्पना चुकीची आहे. प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचाच आजवर अभ्यास झाल्यामुळे ही गैरसमजूत अधिक बळावली आहे. पण कोळी, कुणबी अशा जातीय बोलींचा किंवा खानदेशी, वऱ्हाडी अशा प्रादेशिक बोलींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की पुणेरी मराठीप्रमाणेच या बोलींनाही स्वत:ची अशी नियमव्यवस्था आहे. 'नियमबद्ध संकेतीकरणावर आधारलेल्या संप्रेषण प्रणाली' असेच त्यांचे रूप आहे. मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या प्रादेशिक बोलींचा आणि जातिपरत्वे पडणाऱ्या भेदांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.#7उतारा
पुढील उतारा वाचून प्र.क्र. 46 ते 50 ची उत्तरे लिहा - भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपाचा अभ्यास ही समजूत अलीकडेपर्यंत रूढ होती. प्रगत भाषांना बोली आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात, हे खरे असले तरी, सर्वच भाषांना लिपी असते असे नाही. जगातील भाषांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की बऱ्याचशा भाषांना लिपी नाही, तरी संप्रेषणाचे कार्य त्या करू शकतात. आपल्याकडल्या अशिक्षित माणसाला लिहिता-वाचता आले नाही तरी तो भाषा वापरतच असतो. याचा अर्थ हा की 'बोलणे' हे भाषेचे मुख्य रूप आहे. 'लिहिणे' हे भाषेचे दुय्यम आणि नंतर निर्माण केले गेलेले रूप आहे. लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे. लिपीवरून भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतोच असे नाही. लिखित रूपाच्या पलीकडे भाषेचे कितीतरी वेगवेगळे वापर असतात. भाषाविज्ञानाला या साऱ्यांचा विचार करायचा असतो. म्हणून आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या बोली (औच्चारिक) रूपाचा अभ्यास करण्यावर भर देते. त्यामुळेच टेपरेकॉर्डरसारखी साधने वापरून भाषेचे औच्चारिक नमुने गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे ही पद्धत शास्त्रशुद्ध मानली जाते. भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास ही अशीच एक गैरसमजूत आहे. साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रांत भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे. कुटुंबातील माणसांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलताना भाषेचे अगदी अनौपचारिक रूप आपण वापरत असतो. सभेत भाषण देताना किंवा वर्गात शिकवताना भाषेची वेगवेगळी पण औपचारिक रूपे वापरली जातात. व्यापार उद्योगांसारख्या क्षेत्रांत भाषेचे व्यावहारिक रूप आपल्याला बघायला मिळते. शासकीय व्यवहार, कोर्टकचेऱ्या, जाहिरात-विभाग इत्यादी ठिकाणी भाषेचा वापर कसा करायचा याची विशिष्ट तंत्रे ठरलेली असतात. साहित्यापलीकडे भाषेची अशी जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषेचे समग्र स्वरूप समजावून घेण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात केला जाणारा भाषेचा वापर अभ्यासणे आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलत असते. जात, व्यवसाय यांनुसारही भाषेची रूपे बदलताना दिसतात. यातून एकाच भाषेत भाषाभेद निर्माण होत राहतात. भाषेचा अभ्यास करताना भाषाभेदांचा विचार करावा लागतो. आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक सत्ता हाती असलेला प्रतिष्ठितांचा वर्ग समाजावर नेहमी वर्चस्व गाजवून असतो. प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजवणाऱ्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा आणि समाजातील अन्य वर्गांची भाषा म्हणजे अशुद्ध, असंस्कृत आणि अप्रगत भाषा, हा भाषेबद्दलचा गैरसमजच आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर पुण्याच्या ब्राह्मण वर्गाची भाषा शुद्ध आणि कुणबी किंवा कोळी यांची भाषा अशुद्ध ही कल्पना चुकीची आहे. प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचाच आजवर अभ्यास झाल्यामुळे ही गैरसमजूत अधिक बळावली आहे. पण कोळी, कुणबी अशा जातीय बोलींचा किंवा खानदेशी, वऱ्हाडी अशा प्रादेशिक बोलींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की पुणेरी मराठीप्रमाणेच या बोलींनाही स्वत:ची अशी नियमव्यवस्था आहे. 'नियमबद्ध संकेतीकरणावर आधारलेल्या संप्रेषण प्रणाली' असेच त्यांचे रूप आहे. मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या प्रादेशिक बोलींचा आणि जातिपरत्वे पडणाऱ्या भेदांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.#8उतारा
पुढील उतारा वाचून प्र.क्र. 46 ते 50 ची उत्तरे लिहा - भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपाचा अभ्यास ही समजूत अलीकडेपर्यंत रूढ होती. प्रगत भाषांना बोली आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात, हे खरे असले तरी, सर्वच भाषांना लिपी असते असे नाही. जगातील भाषांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की बऱ्याचशा भाषांना लिपी नाही, तरी संप्रेषणाचे कार्य त्या करू शकतात. आपल्याकडल्या अशिक्षित माणसाला लिहिता-वाचता आले नाही तरी तो भाषा वापरतच असतो. याचा अर्थ हा की 'बोलणे' हे भाषेचे मुख्य रूप आहे. 'लिहिणे' हे भाषेचे दुय्यम आणि नंतर निर्माण केले गेलेले रूप आहे. लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे. लिपीवरून भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतोच असे नाही. लिखित रूपाच्या पलीकडे भाषेचे कितीतरी वेगवेगळे वापर असतात. भाषाविज्ञानाला या साऱ्यांचा विचार करायचा असतो. म्हणून आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या बोली (औच्चारिक) रूपाचा अभ्यास करण्यावर भर देते. त्यामुळेच टेपरेकॉर्डरसारखी साधने वापरून भाषेचे औच्चारिक नमुने गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे ही पद्धत शास्त्रशुद्ध मानली जाते. भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास ही अशीच एक गैरसमजूत आहे. साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रांत भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे. कुटुंबातील माणसांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलताना भाषेचे अगदी अनौपचारिक रूप आपण वापरत असतो. सभेत भाषण देताना किंवा वर्गात शिकवताना भाषेची वेगवेगळी पण औपचारिक रूपे वापरली जातात. व्यापार उद्योगांसारख्या क्षेत्रांत भाषेचे व्यावहारिक रूप आपल्याला बघायला मिळते. शासकीय व्यवहार, कोर्टकचेऱ्या, जाहिरात-विभाग इत्यादी ठिकाणी भाषेचा वापर कसा करायचा याची विशिष्ट तंत्रे ठरलेली असतात. साहित्यापलीकडे भाषेची अशी जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषेचे समग्र स्वरूप समजावून घेण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात केला जाणारा भाषेचा वापर अभ्यासणे आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलत असते. जात, व्यवसाय यांनुसारही भाषेची रूपे बदलताना दिसतात. यातून एकाच भाषेत भाषाभेद निर्माण होत राहतात. भाषेचा अभ्यास करताना भाषाभेदांचा विचार करावा लागतो. आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक सत्ता हाती असलेला प्रतिष्ठितांचा वर्ग समाजावर नेहमी वर्चस्व गाजवून असतो. प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजवणाऱ्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा आणि समाजातील अन्य वर्गांची भाषा म्हणजे अशुद्ध, असंस्कृत आणि अप्रगत भाषा, हा भाषेबद्दलचा गैरसमजच आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर पुण्याच्या ब्राह्मण वर्गाची भाषा शुद्ध आणि कुणबी किंवा कोळी यांची भाषा अशुद्ध ही कल्पना चुकीची आहे. प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचाच आजवर अभ्यास झाल्यामुळे ही गैरसमजूत अधिक बळावली आहे. पण कोळी, कुणबी अशा जातीय बोलींचा किंवा खानदेशी, वऱ्हाडी अशा प्रादेशिक बोलींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की पुणेरी मराठीप्रमाणेच या बोलींनाही स्वत:ची अशी नियमव्यवस्था आहे. 'नियमबद्ध संकेतीकरणावर आधारलेल्या संप्रेषण प्रणाली' असेच त्यांचे रूप आहे. मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या प्रादेशिक बोलींचा आणि जातिपरत्वे पडणाऱ्या भेदांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.#9उतारा
पुढील उतारा वाचून प्र.क्र. 46 ते 50 ची उत्तरे लिहा - भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपाचा अभ्यास ही समजूत अलीकडेपर्यंत रूढ होती. प्रगत भाषांना बोली आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात, हे खरे असले तरी, सर्वच भाषांना लिपी असते असे नाही. जगातील भाषांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की बऱ्याचशा भाषांना लिपी नाही, तरी संप्रेषणाचे कार्य त्या करू शकतात. आपल्याकडल्या अशिक्षित माणसाला लिहिता-वाचता आले नाही तरी तो भाषा वापरतच असतो. याचा अर्थ हा की 'बोलणे' हे भाषेचे मुख्य रूप आहे. 'लिहिणे' हे भाषेचे दुय्यम आणि नंतर निर्माण केले गेलेले रूप आहे. लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे. लिपीवरून भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतोच असे नाही. लिखित रूपाच्या पलीकडे भाषेचे कितीतरी वेगवेगळे वापर असतात. भाषाविज्ञानाला या साऱ्यांचा विचार करायचा असतो. म्हणून आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या बोली (औच्चारिक) रूपाचा अभ्यास करण्यावर भर देते. त्यामुळेच टेपरेकॉर्डरसारखी साधने वापरून भाषेचे औच्चारिक नमुने गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे ही पद्धत शास्त्रशुद्ध मानली जाते. भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास ही अशीच एक गैरसमजूत आहे. साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रांत भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे. कुटुंबातील माणसांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलताना भाषेचे अगदी अनौपचारिक रूप आपण वापरत असतो. सभेत भाषण देताना किंवा वर्गात शिकवताना भाषेची वेगवेगळी पण औपचारिक रूपे वापरली जातात. व्यापार उद्योगांसारख्या क्षेत्रांत भाषेचे व्यावहारिक रूप आपल्याला बघायला मिळते. शासकीय व्यवहार, कोर्टकचेऱ्या, जाहिरात-विभाग इत्यादी ठिकाणी भाषेचा वापर कसा करायचा याची विशिष्ट तंत्रे ठरलेली असतात. साहित्यापलीकडे भाषेची अशी जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषेचे समग्र स्वरूप समजावून घेण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात केला जाणारा भाषेचा वापर अभ्यासणे आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलत असते. जात, व्यवसाय यांनुसारही भाषेची रूपे बदलताना दिसतात. यातून एकाच भाषेत भाषाभेद निर्माण होत राहतात. भाषेचा अभ्यास करताना भाषाभेदांचा विचार करावा लागतो. आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक सत्ता हाती असलेला प्रतिष्ठितांचा वर्ग समाजावर नेहमी वर्चस्व गाजवून असतो. प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजवणाऱ्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा आणि समाजातील अन्य वर्गांची भाषा म्हणजे अशुद्ध, असंस्कृत आणि अप्रगत भाषा, हा भाषेबद्दलचा गैरसमजच आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर पुण्याच्या ब्राह्मण वर्गाची भाषा शुद्ध आणि कुणबी किंवा कोळी यांची भाषा अशुद्ध ही कल्पना चुकीची आहे. प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचाच आजवर अभ्यास झाल्यामुळे ही गैरसमजूत अधिक बळावली आहे. पण कोळी, कुणबी अशा जातीय बोलींचा किंवा खानदेशी, वऱ्हाडी अशा प्रादेशिक बोलींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की पुणेरी मराठीप्रमाणेच या बोलींनाही स्वत:ची अशी नियमव्यवस्था आहे. 'नियमबद्ध संकेतीकरणावर आधारलेल्या संप्रेषण प्रणाली' असेच त्यांचे रूप आहे. मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या प्रादेशिक बोलींचा आणि जातिपरत्वे पडणाऱ्या भेदांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.#10उतारा
पुढील उतारा वाचून प्र.क्र. 46 ते 50 ची उत्तरे लिहा - भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपाचा अभ्यास ही समजूत अलीकडेपर्यंत रूढ होती. प्रगत भाषांना बोली आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात, हे खरे असले तरी, सर्वच भाषांना लिपी असते असे नाही. जगातील भाषांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की बऱ्याचशा भाषांना लिपी नाही, तरी संप्रेषणाचे कार्य त्या करू शकतात. आपल्याकडल्या अशिक्षित माणसाला लिहिता-वाचता आले नाही तरी तो भाषा वापरतच असतो. याचा अर्थ हा की 'बोलणे' हे भाषेचे मुख्य रूप आहे. 'लिहिणे' हे भाषेचे दुय्यम आणि नंतर निर्माण केले गेलेले रूप आहे. लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे. लिपीवरून भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतोच असे नाही. लिखित रूपाच्या पलीकडे भाषेचे कितीतरी वेगवेगळे वापर असतात. भाषाविज्ञानाला या साऱ्यांचा विचार करायचा असतो. म्हणून आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या बोली (औच्चारिक) रूपाचा अभ्यास करण्यावर भर देते. त्यामुळेच टेपरेकॉर्डरसारखी साधने वापरून भाषेचे औच्चारिक नमुने गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे ही पद्धत शास्त्रशुद्ध मानली जाते. भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास ही अशीच एक गैरसमजूत आहे. साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रांत भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे. कुटुंबातील माणसांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलताना भाषेचे अगदी अनौपचारिक रूप आपण वापरत असतो. सभेत भाषण देताना किंवा वर्गात शिकवताना भाषेची वेगवेगळी पण औपचारिक रूपे वापरली जातात. व्यापार उद्योगांसारख्या क्षेत्रांत भाषेचे व्यावहारिक रूप आपल्याला बघायला मिळते. शासकीय व्यवहार, कोर्टकचेऱ्या, जाहिरात-विभाग इत्यादी ठिकाणी भाषेचा वापर कसा करायचा याची विशिष्ट तंत्रे ठरलेली असतात. साहित्यापलीकडे भाषेची अशी जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषेचे समग्र स्वरूप समजावून घेण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात केला जाणारा भाषेचा वापर अभ्यासणे आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलत असते. जात, व्यवसाय यांनुसारही भाषेची रूपे बदलताना दिसतात. यातून एकाच भाषेत भाषाभेद निर्माण होत राहतात. भाषेचा अभ्यास करताना भाषाभेदांचा विचार करावा लागतो. आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक सत्ता हाती असलेला प्रतिष्ठितांचा वर्ग समाजावर नेहमी वर्चस्व गाजवून असतो. प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजवणाऱ्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा आणि समाजातील अन्य वर्गांची भाषा म्हणजे अशुद्ध, असंस्कृत आणि अप्रगत भाषा, हा भाषेबद्दलचा गैरसमजच आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर पुण्याच्या ब्राह्मण वर्गाची भाषा शुद्ध आणि कुणबी किंवा कोळी यांची भाषा अशुद्ध ही कल्पना चुकीची आहे. प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचाच आजवर अभ्यास झाल्यामुळे ही गैरसमजूत अधिक बळावली आहे. पण कोळी, कुणबी अशा जातीय बोलींचा किंवा खानदेशी, वऱ्हाडी अशा प्रादेशिक बोलींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की पुणेरी मराठीप्रमाणेच या बोलींनाही स्वत:ची अशी नियमव्यवस्था आहे. 'नियमबद्ध संकेतीकरणावर आधारलेल्या संप्रेषण प्रणाली' असेच त्यांचे रूप आहे. मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या प्रादेशिक बोलींचा आणि जातिपरत्वे पडणाऱ्या भेदांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.#11उतारा
खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 ची उत्तरे लिहा. युवकांचे वाढते सामान्यज्ञान, स्पर्धात्मक परीक्षांमुळे घडणारी बुद्धीची मशागत, दैनंदिन जीवनात प्रसंगपरत्वे घडणाऱ्या सहज चर्चेमुळे वाढणारा आवाका या गोष्टी व्यक्तीच्या वक्तृत्वक्षमतेचे संगोपन करण्यास साह्यभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त एक भीती आहे. दिवसेंदिवस साधनशरणता वाढते आहे. कोणतीही गोष्ट करवून घेण्याकडे सर्वांचा कल आहे. पूर्वी गणिताचा काही भाग तोंडीच उरकला जात असे. आता गुणाकार, भागाकार व बेरीज यासाठीसुद्धा हाती उपकरण लागते आहे. स्वत: करणे किंवा करून पाहणे वृत्तीत राहिले नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे हा भाव बळावत चालला आहे. माणसे कर्तेपणापासून दूर जात चालली आहेत. मैदानात न उतरता खेळाडू होणार कसा ? आखाड्यात पाऊल न टाकता मल्ल होणार कसा ? शस्त्र न हाताळता सैनिक होणार कसा ? पीठ न मळता स्वयंपाक करणार कसा ? कल्पवृक्षाची झाडे लावून व त्याखाली बसून मनोरथाची पूर्तता करून घेण्याचा सुलभ मार्ग केवळ स्वप्नसृष्टीतच असू शकेल. प्रत्यक्ष वहिवाटली जाणारी पायाखालची वाट खडतर असते, हे ठेचा लागल्यावरच कळते. नव्या पिढीला वक्तृत्व मार्गावरच्या ठेचा अनुभवाव्या लागतील. टाकीचे घाव घ्यावे लागतील. अंगी पात्रता असूनही घडणारी उपेक्षा सहन करावी लागेल. वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून आत शिरावे लागेल. विद्याव्यासंगाची कवचकुंडले धारण करून मोठ्या निर्धाराने पुढे जावे लागेल. मैफलीच्या निमंत्रणाची वाट न पाहता आपल्याच मनात एक मैफल भरवून रियाझ करणाऱ्या गायकाच्या निष्ठेने प्रसंगी आपल्याच मनाशी बोलत राहिले पाहिजे. कोणत्याही सामन्यात कधीही खेळता आले नाही व पुढेही कदाचित मिळणार नाही हे माहीत असूनही बॅट परजून कोठेही खेळात रममाण होणाऱ्या क्रीडाप्रेमी क्रिकेटवीराची तन्मयता वक्त्याच्या अंगी असली पाहिजे. मुलामुलींनी वारंवार मनात डोकावून पाहावे व भेटेल त्या व्यक्तीशी मनोभावे बोलावे. उगाच पाल्हाळ माजवू नये. अकारण आखडते घेऊ नये. चालणाराची पावले नकळत पडत राहतात. जेथे पोचायचे ती जागा दिसताक्षणी ती आपोआप थांबतात. कधी ती माजघराजवळ थांबतील. कधी ती कार्यालयाजवळ स्थिरावतील. कधी एखाद्या मंदिराजवळ, तर कधी बसस्टॉपजवळ ती आपोआप थांबतील. निघणे, चालणे, पोचणे व थांबणे या क्रिया सहज व विनासायास घडतात. हे कर्मकौशल्य अंगी बाणले म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो. बोलण्याच्या बाबतीत तसेच काही घडू शकते. माणसांच्या या जगात सतत माणसे भेटत राहतात. मित्र, शेजारी, भावंडे, आप्तस्वकीय, गुरुजन, पाहुणे, मार्गावरचे परिचित व अपरिचित, या सर्वांशी कारणपरत्वे बोलावे लागतेच. ते बोलणे साक्षीत्वाने, तन्मयतेने, निरामय तटस्थतेने आणि तरीही तल्लीनतेने करण्याची सवय लावून घेतली, तर अंतर्यामी वक्तृत्वाचा एक वेलू मूळ धरील. नकळत तो गगनाकडे वळेल. मग गगन हेच त्याचे सदन होईल.#12उतारा
खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 ची उत्तरे लिहा. युवकांचे वाढते सामान्यज्ञान, स्पर्धात्मक परीक्षांमुळे घडणारी बुद्धीची मशागत, दैनंदिन जीवनात प्रसंगपरत्वे घडणाऱ्या सहज चर्चेमुळे वाढणारा आवाका या गोष्टी व्यक्तीच्या वक्तृत्वक्षमतेचे संगोपन करण्यास साह्यभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त एक भीती आहे. दिवसेंदिवस साधनशरणता वाढते आहे. कोणतीही गोष्ट करवून घेण्याकडे सर्वांचा कल आहे. पूर्वी गणिताचा काही भाग तोंडीच उरकला जात असे. आता गुणाकार, भागाकार व बेरीज यासाठीसुद्धा हाती उपकरण लागते आहे. स्वत: करणे किंवा करून पाहणे वृत्तीत राहिले नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे हा भाव बळावत चालला आहे. माणसे कर्तेपणापासून दूर जात चालली आहेत. मैदानात न उतरता खेळाडू होणार कसा ? आखाड्यात पाऊल न टाकता मल्ल होणार कसा ? शस्त्र न हाताळता सैनिक होणार कसा ? पीठ न मळता स्वयंपाक करणार कसा ? कल्पवृक्षाची झाडे लावून व त्याखाली बसून मनोरथाची पूर्तता करून घेण्याचा सुलभ मार्ग केवळ स्वप्नसृष्टीतच असू शकेल. प्रत्यक्ष वहिवाटली जाणारी पायाखालची वाट खडतर असते, हे ठेचा लागल्यावरच कळते. नव्या पिढीला वक्तृत्व मार्गावरच्या ठेचा अनुभवाव्या लागतील. टाकीचे घाव घ्यावे लागतील. अंगी पात्रता असूनही घडणारी उपेक्षा सहन करावी लागेल. वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून आत शिरावे लागेल. विद्याव्यासंगाची कवचकुंडले धारण करून मोठ्या निर्धाराने पुढे जावे लागेल. मैफलीच्या निमंत्रणाची वाट न पाहता आपल्याच मनात एक मैफल भरवून रियाझ करणाऱ्या गायकाच्या निष्ठेने प्रसंगी आपल्याच मनाशी बोलत राहिले पाहिजे. कोणत्याही सामन्यात कधीही खेळता आले नाही व पुढेही कदाचित मिळणार नाही हे माहीत असूनही बॅट परजून कोठेही खेळात रममाण होणाऱ्या क्रीडाप्रेमी क्रिकेटवीराची तन्मयता वक्त्याच्या अंगी असली पाहिजे. मुलामुलींनी वारंवार मनात डोकावून पाहावे व भेटेल त्या व्यक्तीशी मनोभावे बोलावे. उगाच पाल्हाळ माजवू नये. अकारण आखडते घेऊ नये. चालणाराची पावले नकळत पडत राहतात. जेथे पोचायचे ती जागा दिसताक्षणी ती आपोआप थांबतात. कधी ती माजघराजवळ थांबतील. कधी ती कार्यालयाजवळ स्थिरावतील. कधी एखाद्या मंदिराजवळ, तर कधी बसस्टॉपजवळ ती आपोआप थांबतील. निघणे, चालणे, पोचणे व थांबणे या क्रिया सहज व विनासायास घडतात. हे कर्मकौशल्य अंगी बाणले म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो. बोलण्याच्या बाबतीत तसेच काही घडू शकते. माणसांच्या या जगात सतत माणसे भेटत राहतात. मित्र, शेजारी, भावंडे, आप्तस्वकीय, गुरुजन, पाहुणे, मार्गावरचे परिचित व अपरिचित, या सर्वांशी कारणपरत्वे बोलावे लागतेच. ते बोलणे साक्षीत्वाने, तन्मयतेने, निरामय तटस्थतेने आणि तरीही तल्लीनतेने करण्याची सवय लावून घेतली, तर अंतर्यामी वक्तृत्वाचा एक वेलू मूळ धरील. नकळत तो गगनाकडे वळेल. मग गगन हेच त्याचे सदन होईल.#13उतारा
खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 ची उत्तरे लिहा. युवकांचे वाढते सामान्यज्ञान, स्पर्धात्मक परीक्षांमुळे घडणारी बुद्धीची मशागत, दैनंदिन जीवनात प्रसंगपरत्वे घडणाऱ्या सहज चर्चेमुळे वाढणारा आवाका या गोष्टी व्यक्तीच्या वक्तृत्वक्षमतेचे संगोपन करण्यास साह्यभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त एक भीती आहे. दिवसेंदिवस साधनशरणता वाढते आहे. कोणतीही गोष्ट करवून घेण्याकडे सर्वांचा कल आहे. पूर्वी गणिताचा काही भाग तोंडीच उरकला जात असे. आता गुणाकार, भागाकार व बेरीज यासाठीसुद्धा हाती उपकरण लागते आहे. स्वत: करणे किंवा करून पाहणे वृत्तीत राहिले नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे हा भाव बळावत चालला आहे. माणसे कर्तेपणापासून दूर जात चालली आहेत. मैदानात न उतरता खेळाडू होणार कसा ? आखाड्यात पाऊल न टाकता मल्ल होणार कसा ? शस्त्र न हाताळता सैनिक होणार कसा ? पीठ न मळता स्वयंपाक करणार कसा ? कल्पवृक्षाची झाडे लावून व त्याखाली बसून मनोरथाची पूर्तता करून घेण्याचा सुलभ मार्ग केवळ स्वप्नसृष्टीतच असू शकेल. प्रत्यक्ष वहिवाटली जाणारी पायाखालची वाट खडतर असते, हे ठेचा लागल्यावरच कळते. नव्या पिढीला वक्तृत्व मार्गावरच्या ठेचा अनुभवाव्या लागतील. टाकीचे घाव घ्यावे लागतील. अंगी पात्रता असूनही घडणारी उपेक्षा सहन करावी लागेल. वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून आत शिरावे लागेल. विद्याव्यासंगाची कवचकुंडले धारण करून मोठ्या निर्धाराने पुढे जावे लागेल. मैफलीच्या निमंत्रणाची वाट न पाहता आपल्याच मनात एक मैफल भरवून रियाझ करणाऱ्या गायकाच्या निष्ठेने प्रसंगी आपल्याच मनाशी बोलत राहिले पाहिजे. कोणत्याही सामन्यात कधीही खेळता आले नाही व पुढेही कदाचित मिळणार नाही हे माहीत असूनही बॅट परजून कोठेही खेळात रममाण होणाऱ्या क्रीडाप्रेमी क्रिकेटवीराची तन्मयता वक्त्याच्या अंगी असली पाहिजे. मुलामुलींनी वारंवार मनात डोकावून पाहावे व भेटेल त्या व्यक्तीशी मनोभावे बोलावे. उगाच पाल्हाळ माजवू नये. अकारण आखडते घेऊ नये. चालणाराची पावले नकळत पडत राहतात. जेथे पोचायचे ती जागा दिसताक्षणी ती आपोआप थांबतात. कधी ती माजघराजवळ थांबतील. कधी ती कार्यालयाजवळ स्थिरावतील. कधी एखाद्या मंदिराजवळ, तर कधी बसस्टॉपजवळ ती आपोआप थांबतील. निघणे, चालणे, पोचणे व थांबणे या क्रिया सहज व विनासायास घडतात. हे कर्मकौशल्य अंगी बाणले म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो. बोलण्याच्या बाबतीत तसेच काही घडू शकते. माणसांच्या या जगात सतत माणसे भेटत राहतात. मित्र, शेजारी, भावंडे, आप्तस्वकीय, गुरुजन, पाहुणे, मार्गावरचे परिचित व अपरिचित, या सर्वांशी कारणपरत्वे बोलावे लागतेच. ते बोलणे साक्षीत्वाने, तन्मयतेने, निरामय तटस्थतेने आणि तरीही तल्लीनतेने करण्याची सवय लावून घेतली, तर अंतर्यामी वक्तृत्वाचा एक वेलू मूळ धरील. नकळत तो गगनाकडे वळेल. मग गगन हेच त्याचे सदन होईल.#14उतारा
खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 ची उत्तरे लिहा. युवकांचे वाढते सामान्यज्ञान, स्पर्धात्मक परीक्षांमुळे घडणारी बुद्धीची मशागत, दैनंदिन जीवनात प्रसंगपरत्वे घडणाऱ्या सहज चर्चेमुळे वाढणारा आवाका या गोष्टी व्यक्तीच्या वक्तृत्वक्षमतेचे संगोपन करण्यास साह्यभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त एक भीती आहे. दिवसेंदिवस साधनशरणता वाढते आहे. कोणतीही गोष्ट करवून घेण्याकडे सर्वांचा कल आहे. पूर्वी गणिताचा काही भाग तोंडीच उरकला जात असे. आता गुणाकार, भागाकार व बेरीज यासाठीसुद्धा हाती उपकरण लागते आहे. स्वत: करणे किंवा करून पाहणे वृत्तीत राहिले नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे हा भाव बळावत चालला आहे. माणसे कर्तेपणापासून दूर जात चालली आहेत. मैदानात न उतरता खेळाडू होणार कसा ? आखाड्यात पाऊल न टाकता मल्ल होणार कसा ? शस्त्र न हाताळता सैनिक होणार कसा ? पीठ न मळता स्वयंपाक करणार कसा ? कल्पवृक्षाची झाडे लावून व त्याखाली बसून मनोरथाची पूर्तता करून घेण्याचा सुलभ मार्ग केवळ स्वप्नसृष्टीतच असू शकेल. प्रत्यक्ष वहिवाटली जाणारी पायाखालची वाट खडतर असते, हे ठेचा लागल्यावरच कळते. नव्या पिढीला वक्तृत्व मार्गावरच्या ठेचा अनुभवाव्या लागतील. टाकीचे घाव घ्यावे लागतील. अंगी पात्रता असूनही घडणारी उपेक्षा सहन करावी लागेल. वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून आत शिरावे लागेल. विद्याव्यासंगाची कवचकुंडले धारण करून मोठ्या निर्धाराने पुढे जावे लागेल. मैफलीच्या निमंत्रणाची वाट न पाहता आपल्याच मनात एक मैफल भरवून रियाझ करणाऱ्या गायकाच्या निष्ठेने प्रसंगी आपल्याच मनाशी बोलत राहिले पाहिजे. कोणत्याही सामन्यात कधीही खेळता आले नाही व पुढेही कदाचित मिळणार नाही हे माहीत असूनही बॅट परजून कोठेही खेळात रममाण होणाऱ्या क्रीडाप्रेमी क्रिकेटवीराची तन्मयता वक्त्याच्या अंगी असली पाहिजे. मुलामुलींनी वारंवार मनात डोकावून पाहावे व भेटेल त्या व्यक्तीशी मनोभावे बोलावे. उगाच पाल्हाळ माजवू नये. अकारण आखडते घेऊ नये. चालणाराची पावले नकळत पडत राहतात. जेथे पोचायचे ती जागा दिसताक्षणी ती आपोआप थांबतात. कधी ती माजघराजवळ थांबतील. कधी ती कार्यालयाजवळ स्थिरावतील. कधी एखाद्या मंदिराजवळ, तर कधी बसस्टॉपजवळ ती आपोआप थांबतील. निघणे, चालणे, पोचणे व थांबणे या क्रिया सहज व विनासायास घडतात. हे कर्मकौशल्य अंगी बाणले म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो. बोलण्याच्या बाबतीत तसेच काही घडू शकते. माणसांच्या या जगात सतत माणसे भेटत राहतात. मित्र, शेजारी, भावंडे, आप्तस्वकीय, गुरुजन, पाहुणे, मार्गावरचे परिचित व अपरिचित, या सर्वांशी कारणपरत्वे बोलावे लागतेच. ते बोलणे साक्षीत्वाने, तन्मयतेने, निरामय तटस्थतेने आणि तरीही तल्लीनतेने करण्याची सवय लावून घेतली, तर अंतर्यामी वक्तृत्वाचा एक वेलू मूळ धरील. नकळत तो गगनाकडे वळेल. मग गगन हेच त्याचे सदन होईल.#15उतारा
खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 ची उत्तरे लिहा. युवकांचे वाढते सामान्यज्ञान, स्पर्धात्मक परीक्षांमुळे घडणारी बुद्धीची मशागत, दैनंदिन जीवनात प्रसंगपरत्वे घडणाऱ्या सहज चर्चेमुळे वाढणारा आवाका या गोष्टी व्यक्तीच्या वक्तृत्वक्षमतेचे संगोपन करण्यास साह्यभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त एक भीती आहे. दिवसेंदिवस साधनशरणता वाढते आहे. कोणतीही गोष्ट करवून घेण्याकडे सर्वांचा कल आहे. पूर्वी गणिताचा काही भाग तोंडीच उरकला जात असे. आता गुणाकार, भागाकार व बेरीज यासाठीसुद्धा हाती उपकरण लागते आहे. स्वत: करणे किंवा करून पाहणे वृत्तीत राहिले नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे हा भाव बळावत चालला आहे. माणसे कर्तेपणापासून दूर जात चालली आहेत. मैदानात न उतरता खेळाडू होणार कसा ? आखाड्यात पाऊल न टाकता मल्ल होणार कसा ? शस्त्र न हाताळता सैनिक होणार कसा ? पीठ न मळता स्वयंपाक करणार कसा ? कल्पवृक्षाची झाडे लावून व त्याखाली बसून मनोरथाची पूर्तता करून घेण्याचा सुलभ मार्ग केवळ स्वप्नसृष्टीतच असू शकेल. प्रत्यक्ष वहिवाटली जाणारी पायाखालची वाट खडतर असते, हे ठेचा लागल्यावरच कळते. नव्या पिढीला वक्तृत्व मार्गावरच्या ठेचा अनुभवाव्या लागतील. टाकीचे घाव घ्यावे लागतील. अंगी पात्रता असूनही घडणारी उपेक्षा सहन करावी लागेल. वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून आत शिरावे लागेल. विद्याव्यासंगाची कवचकुंडले धारण करून मोठ्या निर्धाराने पुढे जावे लागेल. मैफलीच्या निमंत्रणाची वाट न पाहता आपल्याच मनात एक मैफल भरवून रियाझ करणाऱ्या गायकाच्या निष्ठेने प्रसंगी आपल्याच मनाशी बोलत राहिले पाहिजे. कोणत्याही सामन्यात कधीही खेळता आले नाही व पुढेही कदाचित मिळणार नाही हे माहीत असूनही बॅट परजून कोठेही खेळात रममाण होणाऱ्या क्रीडाप्रेमी क्रिकेटवीराची तन्मयता वक्त्याच्या अंगी असली पाहिजे. मुलामुलींनी वारंवार मनात डोकावून पाहावे व भेटेल त्या व्यक्तीशी मनोभावे बोलावे. उगाच पाल्हाळ माजवू नये. अकारण आखडते घेऊ नये. चालणाराची पावले नकळत पडत राहतात. जेथे पोचायचे ती जागा दिसताक्षणी ती आपोआप थांबतात. कधी ती माजघराजवळ थांबतील. कधी ती कार्यालयाजवळ स्थिरावतील. कधी एखाद्या मंदिराजवळ, तर कधी बसस्टॉपजवळ ती आपोआप थांबतील. निघणे, चालणे, पोचणे व थांबणे या क्रिया सहज व विनासायास घडतात. हे कर्मकौशल्य अंगी बाणले म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो. बोलण्याच्या बाबतीत तसेच काही घडू शकते. माणसांच्या या जगात सतत माणसे भेटत राहतात. मित्र, शेजारी, भावंडे, आप्तस्वकीय, गुरुजन, पाहुणे, मार्गावरचे परिचित व अपरिचित, या सर्वांशी कारणपरत्वे बोलावे लागतेच. ते बोलणे साक्षीत्वाने, तन्मयतेने, निरामय तटस्थतेने आणि तरीही तल्लीनतेने करण्याची सवय लावून घेतली, तर अंतर्यामी वक्तृत्वाचा एक वेलू मूळ धरील. नकळत तो गगनाकडे वळेल. मग गगन हेच त्याचे सदन होईल.